गंगापूर : शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात विनापरवाना जनावरांची कत्तल करून मांस वाहतूक करत असलेली जीप पोलिसांनी रविवारी पकडली. .या कारवाईत तीन लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोस्ट ऑफिसजवळील जुन्या गेस्ट हाऊसच्या जागेवर संशयास्पद स्थितीत जीप (एमएच २० बीटी ६००३) आढळून आली..तपासणी केली असता सात पांढऱ्या गोण्यांतून २१० किलो (४२ हजार रु. किमतीचे) आणि तीन पिवळ्या गोण्यांतून ४५ किलो (९ हजार रु. किमतीचे) असे एकूण २५५ किलो वजनाचे, एकूण ५१ हजार रुपयांचे मांस सापडले..सदर मांस कुठलाही वैध परवाना नसताना विक्रीसाठी नेत असल्याचे आढळून आले. यावरून पोलिसांनी तीन लाख रुपयांची जीप आणि ५१ हजारांचे मांस असा मुद्देमाल जप्त केला आहे..Chh. Sambhaji Nagar News : पाइपच्या गोदामाला भीषण आग; ९० लाखांची हानी.पोलिस उपनिरीक्षक औदुंबर मस्के यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस निरीक्षक कुमारसिंह राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार दिनकर थोरे तपास करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.