Sambhaji Nagar : वाळूज महानगरच्या घाणेगावात कचरा संकलन सुरू

सरपंच केशव गायकेंनी स्वखर्चाने उपलब्ध केले ट्रॅक्टर
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

वाळूज महानगर : पैसे थकल्याच्या कारणावरून घाणेगाव येथे कचरा संकलन करणे ट्रॅक्टरमालकाने थांबवले होते. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे घाणेगाव येथे स्वच्छतेसह आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर ‘सकाळ’ने कालच ‘पैशांअभावी कचरा संकलन थांबले’ या मथळ्याखाली छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची सरपंच केशव गायके यांनी तत्काळ दखल घेतल्याने कचरा संकलन करणे सुरू झाले आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीच्या पायथ्याशी असलेल्या घाणेगाव येथे कचरा संकलनासाठी पाच ट्राली वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडे ट्रॅक्टर नसल्याने ते भाडेतत्त्वावर लावण्यात आलेले होते. ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बिल थकले होते. वारंवार मागणी करून सुद्धा बिल मिळत नाही. शिवाय ट्रॅक्टरचे टायर बदलणे अत्यावश्यक असल्याने ट्रॅक्टरमालकाने कचरा संकलन बंद केले होते.

परिणामी गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले, त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली. त्यामुळे घाणेगाव येथे स्वच्छतेचे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. यावर आवाज उठवण्यासाठी ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता.१९) ‘पैशांअभावी कचरा संकलन थांबले’ या मथळ्याखाली छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : गरिबांच्या ‘घरकुला’त पुन्हा आडकाठी ; योजनेची पायाभरणीच होईना तर घरभरणी कधी होणार

याची तत्काळ दखल घेत सरपंच केशवअप्पा गायके यांनी स्वतःचे ट्रॅक्टर कचरा उचलण्यासाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे घाणेगाव येथे कचरा संकलन करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गावात स्वच्छता राखली जाणार असून आरोग्याचाही प्रश्न सुटणार आहे.

लवकरच उपलब्ध होणार घंटागाडी

सरपंच केशवअप्पा गायके : गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने शासकीय योजनेतून घंटागाडी खरेदी करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही घंटागाडी लवकरच उपलब्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com