Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Mismatch in Gas Supply and Usage: व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी असतानाही हॉटेल व्यवसाय सुरळीत सुरू असल्याने काळाबाजाराचा संशय व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: एकीकडे जिल्हाभरात गॅसवर अन्नपदार्थ तयार करणारे हॉटेल, रेस्टॉरंट हे सहा हजार परवानाधारक असल्याचे अन्न व औषधी प्रशासन विभाग सांगते, तर दुसरीकडे याच आस्थापनांसाठी वापरल्‍या जाणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची दिवसाकाठी एक हजार २५०ची मागणी असल्याचे जिल्हा प्रशासन सांगते. त्यामुळे याचा हिशेब काळ्याबाजारात तर जुळत नाही ना? अशी चर्चा खुद्द पुरवठा विभागातच सुरू आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पाच मार्चपासून म्हणजेच तब्बल १९ दिवसांपासून बंद आहे. या १९ दिवसांच्या कालावधीत शहर, जिल्ह्यात कोळशांवर चालणाऱ्या शेगड्यांसह डिझेल भट्टींचा वापर करुन हॉटेल्स, केटरिंग, ढाबे, खानावळी, रेस्टारंट, अन्न निर्मिती केंद्रे सुरू असल्याचे चित्र होते. असे असतानाही एकही मोठे हॉटेल, रेस्टॉरंट अद्याप बंद पडलेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com