'तिच्या’ साठी परीक्षा केंद्रे असावीत सुसज्ज महिलांचा सूर: सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, स्वच्छतागृहांची सोय बंधनकारक

टेन्शन, स्पर्धा, भीती यामुळे ऐन परीक्षेदरम्यान मुलींना मासिक पाळी येते. अशावेळी केंद्रांवर सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, स्वच्छतागृह आणि मुबलक पाणी असणे बंधनकारक असायला हवे.
Women Care Tips
Women Care TipsSakal

स्त्री-पुरुष समानतेची वाट सोपी करताना मुलींना मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेचे क्षेत्रही आलेच. सध्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांइतकेच किंबहुना जास्त असते. टेन्शन, स्पर्धा, भीती यामुळे ऐन परीक्षेदरम्यान मुलींना मासिक पाळी येते. अशावेळी केंद्रांवर सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, स्वच्छतागृह आणि मुबलक पाणी असणे बंधनकारक असायला हवे. तशी व्यवस्था आहे की नाही, याची तपासणी करूनच परीक्षा केंद्रांची निवड व्हायला हवी, असा सूर महिला वर्गातून निघत आहे.

‘नीट २०२४’ ही परीक्षा ५ मेरोजी घेण्यात आली. एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या परीक्षेसाठी ४० केंद्रे होती आणि २१ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शहरासह इतर जिल्ह्यांतून विद्यार्थी आले होते. ‘नीट’ परीक्षा शिस्तीसाठी ओळखली जाते. हाय हिलच्या सँडल, बूट न घालण्याच्या सूचना होत्या. बेल्ट, टोपी, पाकीट, घड्याळ, दागिने यासह अगदी हाताला बांधलेला दोरासुद्धा काढावा लागतो. ड्रेसकोड ठरवून दिला जातो. अशावेळी तणावामुळे मुलींना अचानक मासिक पाळी येते.

दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. ‘नीट’ परीक्षेवेळी घडलेली घटना कोणत्याही मुलीसोबत, महिलेसोबत कुठेही घडू शकते. प्रत्येक वेळी मुली ‘तयारी’त येतातच, असे नाही. अशावेळी परीक्षा केंद्रांवर सुसज्ज स्वच्छतागृह आणि सॅनिटरी व्हेंडिंग मशीन असायलाच हवे.

‘क्षितिज’ संस्था महिला आरोग्य या विषयावर राज्यभरात काम करते. तसेच ‘ब्लीड द सायलेंस’ नावाची मासिक पाळी जनजागृती मोहीम राबवते. संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी यांनी सांगितले, की मुलींसाठी केंद्रांवर पुरेशा सुविधा, स्वच्छ व मुबलक पाणी आणि सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध असणे बंधनकारक असावे.

एक उदाहरण

रविवारी एका परीक्षा केंद्रावर अशीच घटना घडली. एका विद्यार्थिनीला अचानक पाळी आली. ती धावतच खाली आली. सुदैवाने तिथे महिला पोलिस कर्मचारी होत्या. त्यांनी मुलीला धीर दिला, लगेचच गेटमधून तिच्या आईला आवाज दिला. आईने तिला सॅनिटरी पॅड दिले. पण पुन्हा प्रश्न होता ते आत न्यायचे कसे? अखेर त्याच पोलिस कर्मचारी महिलेने सेंटरवर तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या मुलांना इशारा केला आणि ती मुलगी आत जाऊ शकली. 

Women Care Tips
स्थलांतरामुळे घसरतोय मतदानाचा टक्का, ग्रामीण भागातून सर्वाधिक परिणाम

प्रत्येक महाविद्यालय आणि शाळेमध्ये ‘आनंदी खोली’ असणे आवश्यक आहे. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन, आरामासाठी बेड, पॅड डिस्पोजल करण्याची मशीन, मिनी लायब्ररी असते. विशेषतः जिथे परीक्षेचे सेंटर आहेत तिथे प्रथमोपचार पेटी, सॅनिटरी पॅड, मुलींना पॅड चेंज करण्याची जागा, सुसज्ज स्वच्छतागृहे आवश्यक आहे. या विषयावर पुरुषांनीही आता बोलते करण्याची गरज आहे.

- स्नेहल चौधरी, संस्थापक, क्षितिज फाउंडेशन

परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधांसह प्रसाधनगृहे असणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी का होत नाही, याचा आढावा मी स्वतः घेईल.

- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com