

GMC Ghati
sakal
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) पदव्युत्तर आयुर्विज्ञान शिक्षण मंडळाने (पीजीएमईबी) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) येथील २९ पीजी अभ्यासक्रमांच्या २२५ जागांना ‘सशर्त नूतनीकरण मान्यता’ दिली, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.