

Gold Silver Prices Drop
sakal
हरेंद्र केंदाळे
छत्रपती संभाजीनगर : दसरा आणि दिवाळीत सोने-चांदीचे दर गगनाला भिडले होते. या कालावधीत सोने आणि चांदी दोन्ही सर्वकालीन उच्चांकावर पोचले होते. मात्र, दिवाळी संपताच चांदीची झळाळी कमी झाली असून, १५ ऑक्टोबरपासून शुक्रवारपर्यंत (ता. ३१) सुमारे २८ हजार ४९० रुपयांनी घट झाली.