
Ghati Hospital
sakal
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) सध्या २०० एमडी, एमएस या ‘पीजी’ अभ्यासक्रमाच्या जागा असून यावर्षी १०० टक्के प्रवेश झाले. या शैक्षणिक वर्षात ११ विषयांतील तब्बल ८५ ‘पीजी’च्या जागा वाढविण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे रुग्णसेवेला बळकटी मिळणार आहे. तसेच एमबीबीएसच्या ५० जागा वाढविण्यासाठीही राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करणार आहोत, अशी माहिती डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.