esakal | Gram Panchayat Election: मतमोजणीला दारू विक्री बंद; मतदानाच्या आदल्या दिवशीही बंद ठेवण्याचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

liquor ban

मतदानाच्या आदल्या दिवशी जिल्हयातील सर्व प्रकारच्या मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत

Gram Panchayat Election: मतमोजणीला दारू विक्री बंद; मतदानाच्या आदल्या दिवशीही बंद ठेवण्याचे आदेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: जिल्हयातील एप्रिल-२०२० ते डिसेंबर-२०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.१५ ) मतदान होणार आहे. त्यानंतर सोमवारी (ता.१८) मतमोजणी होणार आहे. या दोन्ही दिवशी तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी जिल्हयातील सर्व प्रकारच्या मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

जिल्ह्यत ग्रामपंचायत निवडणुकीनिमित आदर्श आचार संहिता लागू आहे. या कालावधीत निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे आणि मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९ च्या कलम १४२ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील सर्व प्रकारच्या मद्याची आणि दारुची दुकाने बंद ठेवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

बीड बायपास परिसरात कुत्र्यांची दहशत; मोकाट कुत्र्याने तोडले चार जणांचे लचके

मतदानापूर्वीचा एक म्हणजे दिवस गुरूवारी ( ता. १४ ) संपूर्ण दिवस, तसेच मतदानाच्या शुक्रवारी ( ता. १५ ) संपूर्ण दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील. सोमवारी ( ता. १८ ) जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. त्यानुसार ज्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्या तालुका मुख्यालयाच्या हद्दीत मतमोजणी संपेपर्यंत मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील, असेही जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top