esakal | कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूतांच्या पॅनलचा पराभव, नितीन पाटील ठरले वरचढ
sakal

बोलून बातमी शोधा

Udaysing Rajput And Nitin Patil

या गावाने कन्नड तालुक्याला समृद्ध नेतृत्व दिलेले आहे. नागद या गावाला मोठी राजकीय परंपरा आहे.

कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूतांच्या पॅनलचा पराभव, नितीन पाटील ठरले वरचढ

sakal_logo
By
मनोज पाटील

कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील नागद येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा अनेक अर्थाने चांगलीच गाजली. येथे १५ जागांपैकी ८ जागा जिंकून माजी आमदार नितीन पाटील यांच्या पॅनलची सरशी झाली असून विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलला ५ जागांवर विजय मिळवता आला. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

विद्यमान व माजी आमदार आमच्या सामने असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्यातील जाणकारांचे लक्ष लागून होते. या गावाने कन्नड तालुक्याला समृद्ध नेतृत्व दिलेले आहे. नागद या गावाला मोठी राजकीय परंपरा आहे. माजी आमदार स्व.नारायणराव नागदकर, माजी आमदार नितीन पाटील आणि आता आमदार उदयसिंग राजपूत असे तब्बल तीन आमदार या गावातले आहेत. शिवाय जिल्हा बँकेचे अध्यक्ष स्व.सुरेश पाटील हेही याच गावचे आहेत. या निवडणुकीत माजी आमदार नितीन पाटील गटाचे आदर्श परिवर्तन विकास पॅनलचे विजयी उमेदवार (कंसात पराभूत उमेदवारांचे नाव)

 • अहिरे प्रकाश राजधर ( गोपालसिंग जयसिंग चन्नावत),
 • माया  मयाराम तेवर(बत्तीबाई तुळशीराम चव्हाण),
 • शोभाबाई भिमराव अहिरे  (दुर्गाबाई अशोक सोनवणे)          
 • गोठवाळ नामदेव भावसिंग (सरदारसिंग किसनसिंग चन्नावत),
 • मासरे रत्ना दिपक ( कासुबाई जबन गायकवाड ),
 • अलका विजय सूर्यवंशी(मनिषाबाई दिलीप ताटू)
 • रणजीत भास्करराव ठाकरे (सचिन रमणलाल बेदमुथा),
 • गीताबाई जयरमसिंग महाजन(रुपाली रवींद्र वाघ)
 • उदयसिंग राजपूत यांच्या जनसेवा ग्रामविकास पॅनल विजयी उमेदवार
 • विकास सरदारसिंग राजपूत ( हजारी जितेंद्र रामसिंग),
 • नाना देवराम अहिरे(जाधव ईश्वर नारायण),
 • रुपाली सुनील कुमावत (ठाकरे मालनबाई सुरेश) कांताबाई हिरालाल राजपूत(शिंदे शोभाबाई दिलीप),
 • मोगलबाई यादव राजपूत विजयी

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

तसेच  मदनसिंग रुपसिंग लोदवाळ व बापू विक्रम मोरे हे दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. माजी आमदार नितीन पाटील तसेच डॉ. दिलीपसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या विजयासाठी सुभाष महाजन,भगवान ठाकरे,बबलू पाटील,छोटू पाटील, दिनेश शिरा ,मुक्तानंद पाटील, संदीप पाटील, भगवान मोरे ,दिनेश मोरे,राहुल पाटील,भोला  महाजन,सचिन ठाकरे आदींनी पुढाकार घेतला.

संपादन - गणेश पिटेकर

loading image