छत्रपती संभाजीनगर : ‘काल आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) इथे केलेल्या इव्हिनिंग वॉक नंतर भाषणात २५ वेळा देवेंद्र फडणवीस साहेब... असे तुणतुणे वाजवले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. आमच्या कुठेही ४८ बोगस फॅक्टरी नाहीत. खोट्या फॅक्टऱ्या निर्माण करून आमच्याकडे कुठेही अवाढव्य संपत्ती नाही. याची सुद्धा चौकशी चालू आहे. हे त्यांनाही माहीत आहे. जो खुद काच के घर मे रहते है, ओ दुसरो के घरोपर पत्थर नही मारा करते.’ असे म्हणत पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी गर्भित इशारा दिला.