Gudi Padwa 2024 : पाचशे कुटुंबांचा आज गृहप्रवेश; तब्बल साडेचारशे चारचाकी, दोन हजार दुचाकी येणार रस्त्यावर

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यासाठी बाजारपेठ सज्ज आहे. सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, साखरेच्या गाठी, पूजेच्या साहित्याची जोरदार विक्री होत आहे.
gudi padwa festival 2024 500 family make move in new home purchase of car and bike
gudi padwa festival 2024 500 family make move in new home purchase of car and bikeSakal

छत्रपती संभाजीनगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यासाठी बाजारपेठ सज्ज आहे. सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, साखरेच्या गाठी, पूजेच्या साहित्याची जोरदार विक्री होत आहे. दुचाकी, चारचाकी वाहन बाजारात अगोदरपासूनच चांगली मागणी असून, गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सातशे चारचाकी आणि तब्बल दोन हजार दुचाकींची बुकिंग झाली.

यापैकी साडेचारशे चारचाकी रस्त्यावर येतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. यासोबत पाचशे कुटुंब नवीन घरांत प्रवेश करतील. त्यामुळे मंगळवारी (ता. नऊ) गुढीपाड्याव्याच्या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल.

गुढीपाड्यावच्या दिवशी नवीन गृहप्रवेश, सोने-चांदी, वाहनांसह नवीन वस्तू खरेदीला विशेष महत्त्व असते. सध्या कडक उन्हाचा परिणाम बाजारपेठांवर जाणवत आहे. तरी लग्नसराई सोबतच गुढीपाडवा,

ईद-उल-फित्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असे तिन्ही उत्सव एकापाठोपाठ आल्याने बाजारात खरेदीचा उत्साह आहे. रेडिमेड कपडे मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सराफा बाजारात ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून व्यापाऱ्यांनी लाखोंचा नवीन माल भरला आहे. बाजारात खरेदीसाठी लगबग वाढली आहे.

महिन्यापूर्वीच बुकिंग

दुचाकी व चारचाकीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मागील महिन्यापासूनच शहरातील विविध शोरूम्समध्ये गर्दी होत आहे. चारचाकीमध्येदेखील हायब्रिड वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. मार्च महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारकडून विशेष अनुदान देण्यात येत होते. त्याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी मार्च महिन्यातच वाहनांची बुकिंग केली.

मुहूर्तवेळेत वाहन मिळावे, यासाठी १५ दिवसांआधीच लोकांनी बुकिंग केले. शहरात दुचाकीसह पेट्रोलवरील वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांनाही मागणी वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आजपर्यंत सुमारे सातशे कार आणि दोन हजार दुचाकींची बुकिंग झाली. चारचाकी वाहनाची प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी माहिती ऑटोमोबाइल असोसिएशनचे विकास वाळवेकर आणि विनोद दीक्षित यांनी दिली.

पाचशे गृहप्रवेश, हजार बुकिंग

शहरात आपले हक्काचे घर असावे यासाठी अनेक जण गुढीपाडव्याला गृहप्रवेश करतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या विविध भागातील बांधकाम व्यावसायिकांकडे घरांचे बुकिंग पूर्ण झालेले आहे. असे पाचशे जण पाडव्याच्या दिवशी गृहप्रवेश करतील तर स्वप्नातील घरासाठी एक हजार नवीन बुकिंग होतील. सध्या घरांची वाढती मागणी आहे.

सोने-चांदीच्या किमती विक्रमी

सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदीला नेहमीच प्राधान्य दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने दरात सतत विक्रमी वाढ सुरू असल्याने शहरातील सराफा बाजार संथ आहे. पाडव्यानिमित्त सुमारे १२ कोटींचा व्यवसाय अपेक्षित असून, त्यापैकी २५ टक्के बुकिंग झालेली आहे. सोन्याच्या किमती प्रतितोळा ७१ हजार ९०० तर चांदी ८३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com