

Chh. Sambhajinagar
sakal
शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील गुरु धानोरा येथील पाझर तलाव परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या गाईचा पाणी पिताना पाय घसरल्याने ती तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचाही गाई बरोबर तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. दोन ) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.