औरंगाबाद : पुण्यात सहकाऱ्याचा खून करून पळालेले दोघे जेरबंद

आष्टी पोलिसांची कारवाई : वेषांतर करून फिरत होते दुचाकीने
crime
crimesakal

आष्टी : हडपसर (पुणे) पोलिस ठाणे हद्दीत खून करून फरारी झालेले दोन आरोपी आष्टी पोलिस ठाणे अंतर्गत कडा दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचाऱ्यांनी शिताफीने पकडून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले. वेषांतर करून दुचाकीवर फिरणारे हे आरोपी पंधरा दिवस पुणे पोलिसांना चकवा देत होते.

हडपसर परिसरात मांजरी येथे पेंटर काम करणारा कारागीर सागर दास आणि त्याच्याबरोबर काम करणारे सहकारी गौरव कारखिले व राजू सोनवणे यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन कारखिले आणि सोनवणे यांनी सागरला लाकडी दांडके आणि प्लॅस्टिक पाईपने aमारहाण केली. त्यामध्ये सागरचा मृत्यू झाला. ता. ५ ते ६ जूनच्या दरम्यान घडलेल्या या घटनेबाबत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

दरम्यान, घटनेनंतर दोन्ही आरोपी फरारी झाले. पुणे पोलिसांना हे दोन आरोपी आष्टी तालुक्यातील कडा परिसरात फिरत असल्याचे मोबाईल लोकेशनवरून ट्रेस झाल्यामुळे त्यांनी आष्टी पोलिसांना कळविले. स्वतःची ओळख लपवण्यासाठी नकली दाढी लावून वेषांतर केलेले दोन आरोपी दुचाकीने फिरत असल्याचे सांगून या भागात अशा वर्णनाचे दोघेजण फिरत आहेत का, याची माहिती घेण्यात सांगितले.

कडा दूरक्षेत्राचे हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलीस नाईक गंगाधर आंग्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल बंडू दुधाळ यांनी कडा परिसरातील गॅरेजवाल्यांना ही माहिती दिली आणि माहिती देण्यास सांगितले. त्यानुसार एका गॅरेजवर हे दोन्ही आरोपी आले असता गॅरेजवाल्याच्या फोनवरून गौरव कारखिले याने त्याच्या पत्नीला फोन करून दोन हजार रुपये फोन पेवर टाकण्यास सांगितले. ही माहिती हवालदार गर्जे यांना कळविण्यात आली. तोपर्यंत दोन्ही आरोपी नगरच्या दिशेने गेल्याचे समजले. गर्जे यांनी गॅरेजमालकाला गौरवच्या पत्नीला पुन्हा फोन करण्यास सांगितले आणि पैसे तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार पत्नीशी बोलणे झाल्यामुळे दोन्ही आरोपी कड्याकडे परत येत आहेत अशी माहिती मिळाली.

यादरम्यान आष्टी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी तपासाची चक्रे फिरवत बाबासाहेब गर्जे यांना मार्गदर्शन केले. याच वेळी दोन्ही आरोपी कडा बसस्थानकाजवळ आले असता त्यांना पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. वरिष्ठांना याची माहिती देऊन पुणे पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com