निसर्गाने थट्टा मांडली -----, पिकास सोबत स्वप्नही करपली

निसर्गाने थट्टा  मांडली -----, पिकास सोबत स्वप्नही करपली
Published on: 
हडोळती : पावसाने दगा दिल्याने पावसाळ्यात कोरडाठाक पडलेला बंधारा. पावसाळ्यात कोरडा असलेला नाला. विहिरींमध्ये असलेला जेमतेम जलसाठा. पावसाअभावी कुरणातही शिल्लक राहिलेले वाळलेले गवत, झाडेझुडपे. कपाशीच्या पिकाची झालेली अवस्था. सोयाबीनचे वाळून गेलेले पीक. कोरड्या आभाळाकडं बघून होतं काळजाचं पाणी --- हडोळती परिसरातील चित्र, बंधाऱ्यासह नाले पाण्याविना, विहिरीही तळाला, पिकांची वाताहत धोंडोपंत कुलकर्णी हडोळती, ता.८ : मृग व स्वाती नक्षत्रातातील जेमतेम पावसाने पिके बहरली होती. परंतु नियतीच्या मनात वेगळे होते. लहान गोजिरवाण्या पिलाप्रमाणे शेतातील कोवळ्या पिकांनीही शेतकऱ्यांना मोह पाशात बांधले. परंतु गोजिरवाणे दिसणारे हे पीक ऐन बहारात पावसाअभावी करपलं. निसर्गाने खूप मोठा विश्वासघात केला. काळ्या आईची ओटी भरता भरता खिसा रिकामा झाला, आता करपलेल्या शिवारात फक्त पावसाची वाटच उरली. कोरड्या आभाळाकडं बघून काळजाचं पाणी पाणी होतं, अशी भावना परिसरातील शेतकरी भाऊसाहेब यादव यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना दुःखांच्या दुःखाच्या भावना धड व्यक्त करता येईनात व त्यातून मार्गही सुचेनासा झाला आहे. करपलेल्या शिवारासह आयुष्याची रंगवलेली स्वप्ने ही जळाली आहेत. दुष्काळाने संसाराची घडी विस्कटली. दावणीला बांधलेल्या पशुधनाचीही चिंता आहे. शिवारात चाराही नाही, विहिरीला पाणी नाही यातून संसाराचा गाडा चालवायचा कसा या भीतीचे काहूर शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक उन्नी येथे सोयाबीनचा कापणी प्रयोग झाला. यात अर्ध्या गुंठ्यात फक्त ४३५ ग्रॅम उत्पादन निघाले याप्रमाणे एकरी ३४८ किलो उत्पादन झाले. एकरी सोयाबीनचा उत्पादन खर्च १९ हजारपर्यंत झाला असून उत्पादन फक्त २ हजार १०० रुपये झाले आहे. यात १८ हजार ९०० रुपयांचा निव्वळ तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे शेतकरी आता उघड्यावर वर्ष १९७२ पेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन कोरडवाहूसाठी हेक्टरी ८ हजार रुपये मदत देते. शेतीत झालेल्या खर्चाच्या तुलनेत कितीतरी पटीने ही मदत तोकडी आहे. राजकारणी शेतकऱ्यांना उघड्यावर सोडणार नाही, अशी वल्गना पुढारी करतात, मात्र खरेच उघडे उघड्यावर पडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव मदत म्हणून मिळवून देणार काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे पेरणी झाली पण कापणी हुकली दुष्काळाने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. दरवर्षी शेतातील पिकाकडून चांगल्या उत्पादनाची हमी असताना हुलकावणी मिळते. यंदा तर कहर झाला आहे. यातून जगाचा पोशिंदा उघड्यावर पडणार नाही याची काळजी शासनाने घ्यायला हवी. पेरणी झाली पण कापणी हुकली अशी परिस्थिती शिवाराची झाली आहे असे मत शेतकरी भाऊसाहेब यादव यांनी व्यक्त केले. कोट---- कर्जमाफी योजना मृगजळ ठरत आहे. त्यातच विविध अनुदानातून कर्जाची रक्कम कपात करण्याचे संमती पत्र लिहून घेतले जात आहे. निसर्गाने तर थट्टा मांडलीच आहे, मात्र कर्जमाफीनेही खिल्ली उडविली आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. -विठ्ठलराव जाधव, शेतकरी हिप्पळगाव -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com