esakal | मोदी सरकारच्या निर्णयामुळे सहकारला कायद्यांचे पाठबळ : बागडे
sakal

बोलून बातमी शोधा

haribhau bagade defeat in Aurabgabad dcc bank election

मोदी सरकारच्या निर्णयामुळे सहकारला कायद्यांचे पाठबळ : बागडे

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : देशाचा विचार करत सहकार क्षेत्राला वाचवण्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सहकार मंत्रालयाचीMinistry Of Co-operation निर्मिती केली आहे. याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Union Home Minister Amit Shah यांच्याकडे सोपवली आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र वाचवण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे निर्णय अभिनंदनास पात्र असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे माजी सभापती आमदार हरिभाऊ बागडे MLA Haribhau Bagade यांनी गुरुवारी (ता.आठ) दिली. श्री.बागडे म्हणाले की, मोदी सरकारने मंगळवारी नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय जाहीर केला, तर बुधवारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात या नव्या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समर्थ नेतृत्वावर सोपविली आहे. harbhau bagade said, cooperation ministry supplimentary for cooperative sector

हेही वाचा: Modi Cabinet : भागवत कराडांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

नवे मंत्रालय हे सहकार क्षेत्रासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस - व्यवसाय सुलभता निर्माण करण्यास आणि मल्टी स्टेट सहकारी संस्थांसाठी उपयुक्त ठरेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सहकार क्षेत्राला सध्या फार मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. या क्षेत्रालाही व्यवसाय सुलभता मिळण्याची गरज आहे. यावर मोदी सरकारने भर दिला हे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील सहकार क्षेत्राला केंद्र सरकारच्या धोरणांचे आणि कायद्यांचे पाठबळ मिळेल. त्यामुळे या क्षेत्राला आर्थिक शिस्त निर्माण करण्यास आणि सध्याच्या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल. सहकार क्षेत्रावर अवलंबून असलेल्या असंख्य सामान्य शेतकरी आणि ठेवीदारांच्या हिताचे मोदी सरकारच्या निर्णयामुळे रक्षण होईल, असेही आमदार बागडे यांनी सांगितले.

loading image