राज्य सरकारमुळेच शेतकरी उद्ध्वस्त; हरिभाऊ बागडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 हरिभाऊ बागडे
राज्य सरकारमुळेच शेतकरी उद्ध्वस्त; हरिभाऊ बागडे

राज्य सरकारमुळेच शेतकरी उद्ध्वस्त; हरिभाऊ बागडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेली नुकसानाची भरपाई देण्याऐवजी घोषणा करण्यात सरकार पुढे असून हे सरकार शेतकऱ्यांच्या जमखेवर मीठ चोळत आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली असून पीक विमा कंपन्यांचे हिताचे निर्णय घेत शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटण्याचे कामही याच सरकारने केल्याचा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा: 'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

आमदार बागडे म्हणाले,” सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार, हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, गेल्या दोन वर्षांत राज्यातील अतिवृष्टीचा, महापुराचा आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना किरकोळ मदत करीत शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोपही बागडे यांनी केला. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अलीकडेच आघाडी सरकारने १० हजार कोटी मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्या आधी जुलैमध्ये पूर आणि पावसाचा फटका बसलेल्यांना ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी, पुनर्वसनासाठी आहेत. याचा अर्थ पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांसाठी केवळ दीड हजार कोटींची तातडीची मदत करण्यात आली,’ असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागात ५० लाख हेक्टरवरील पिके नाहीसे झाली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, शेतकऱ्यांना कुठलीच मदत पोहचलेली नाही. मदत देणे सोडून केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचेही बागडे म्हणाले. यावेळी आमदार प्रशांत बंब, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कल्याण गायकवाड, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, डॉ. राम बुधवंत, राधाकिसन पठाडे, तालुका अध्यक्ष राम शेळके उपस्थित होते.

loading image
go to top