esakal | संजना दानवे म्हणून नक्की फिरावे', हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्यातील वाद विकोपाला
sakal

बोलून बातमी शोधा

Harshwarda And Sanjana Jadhav News

तुम्ही त्याला अत्यंत वाईट पद्धतीने त्रास देतायत एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही साक्षात तुमच्या मुलाच्या विरोधात पॅनल उभे करतात. आणि पुन्हा मतदारसंघात फिरत असताना तुम्ही संजना हर्षवर्धन जाधव आहे

संजना दानवे म्हणून नक्की फिरावे', हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्यातील वाद विकोपाला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांची पत्नी संजना जाधव यांच्यातील राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसत आहे. सध्या हर्षवर्धन हे त्यांची सहकारी ईशा झा यांच्यासह मतदारसंघात मेळावे, दौरे करत आहेत. यात त्यांची पत्नी संजना जाधव या ही राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्याही नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांच्या सत्कार, विविध मेळाव्यात दिसत आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियात व्हिडिओ प्रसारित करुन म्हटले आहे, की माझी पत्नी म्हणून संजना जाधव आजकाल कन्नड-सोयगाव मतदारसंघात फिरत आहेत. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, ज्या पतीला तुम्ही म्हणताय की हा माणूस बरोबर नाही.

तुम्ही त्याला अत्यंत वाईट पद्धतीने त्रास देतायत एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही साक्षात तुमच्या मुलाच्या विरोधात पॅनल उभे करतात. आणि पुन्हा मतदारसंघात फिरत असताना तुम्ही संजना हर्षवर्धन जाधव आहे, अशा पद्धतीने प्रचारप्रसार करताय. मला अस वाटत की हा घाणेरडेपणा आहे. राजकारणासाठी स्वार्थासाठी माणुस किती खाली पडू शकतो. याच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे संजना जाधव. मी मतदारसंघातील तमाम नागरिकांना सूचना करतो, की माझ्या जोडीदार आता ईशा आहेत.

संजना जाधवांना त्यांच्या पापाची फळे मिळावी यासाठी घटस्फोटाचा अर्ज मी दाखल केला आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर त्या म्हणत असतील, की मी संजना हर्षवर्धन जाधव आहे. कुठेतरी हा निर्लज्जपणा आपण लक्षात घ्यावा. माझ्या आईसाहेब मध्यंतरी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मला आणि ईशाला प्रचंड असे आशीर्वाद दिले आहे. अशा स्थितीत संजना या हर्षवर्धन जाधव यांची पत्नी म्हणून फिरत असतील तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यात कोणीही समाविष्ट होऊ नये. संजना यांनी संजना दानवे म्हणून नक्की फिरावे, असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.  

संपादन - गणेश पिटेकर