esakal | ‘ट्रायल’साठी कार घेऊन पळाले... ९० किलोमीटर पाठलाग करून पकडले!
sakal

बोलून बातमी शोधा

कार.

‘ट्रायल’साठी कार घेऊन पळाले... ९० किलोमीटर पाठलाग करून पकडले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ऊसने सहा हजार रुपये देण्यासाठी दोघा मित्रांनी शक्कल लढवली अन् थेट गेले कार खरेदी विक्रीच्या केंद्रावर. तिथून ट्रायल घ्यायची म्हणत कार घेतली खरी, पण कारमध्ये बसल्यानंतर कारसोबत आलेल्या एकाच्या गळ्याला चाकू लावत रस्त्यात उतरुन दिले अन् दोघे मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईत कार विक्री करुन उसने पैसे परत करण्याचा दोघांचा इरादा होता. मात्र, गुन्हे शाखेने तब्बल ९० किलोमीटर ‘सिनेस्टाईल’ पाठलाग करुन दोघा आरोपींना कारसहित अटक केली. दुपारी सव्वा एकदरम्यान सुरु झालेला हा थरार साडेतीन वाजता थांबला. (Aurangabad News)

हेही वाचा: अन् पुरासोबत शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले

आरोपी फैसल रफीक सय्यद (२४, रा. गल्ली क्र. ८, रहेमानिया कॉलनी) आणि आरोपी सय्यद आरबाज सय्यद आरेफ (रा. रोशन गेट) हे दोघे मित्र आहेत. आरोपी फैसलकडे नारेगावातील फैजान नावाच्या व्यक्तीचे सहा हजार रुपये होते. ते परत करण्यासाठी दोघा मित्रांनी शक्कल लढविली. फैसल याने त्याच्या काकाची स्कूटी (एमएच २०, ईबी २०६) घेतली आणि दोघेही साखरे मंगल कार्यालयाजवळील वैष्णवी मोटर्स येथे गेले. तिथे आम्हाला कार खरेदी करावयाची आहे असे सांगत नामांकित कंपनीची आलिशान कार (एमएच १५ डीसी ३४८८) पाहून घेतली. दरम्यान मोटर्सच्या मालकाला कार आवडल्याचे सांगत ट्रायल घ्यावयाची असल्याचे आरोपींनी सांगितले.

loading image
go to top