

Doctors Step Into the Literary World, Celebrate Reading
Sakal
छत्रपती संभाजीनगर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मॉर्ड संघटनेच्या डॉक्टरांनी प्रदर्शनाला भेट देत विविध विषयांवरील पुस्तके हाताळत खरेदीही केली. वाचन व्यक्तीला समृद्ध करते. त्यामुळे सतत वाचायला हवे, असा प्रातिनिधिक सूर त्यांच्या प्रतिक्रियांमधून उमटला. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनात मार्डचे अध्यक्ष डॉ. चैतन्य ढावरे, डॉ. स्नेहा गुणाले, डॉ. अलिशा निकम, डॉ. सोनम मिसाळ, डॉ. वैभव ठाकरे, सचिव डॉ. शुभम सावळकर, सहसचिव डॉ. मौनम कुबनानी यांची यावेळी उपस्थिती होती.