औरंगाबादेत मुसळधार, बजरंग चौकात पुन्हा साचले तळे

आठ ते दहा दुकानात घुसले पाणी, व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान
औरंगाबादेत मुसळधार, बजरंग चौकात पुन्हा साचले तळे
sakal

औरंगाबाद : रात्रीपासून शहरात सुरु झालेल्या पावसाने व्यापाऱ्यांचीही झोप उडाली आहे. रात्रीतून दुकानात पाणी घुसल्याने सकाळी अनेकांची तारांबळ उडाली. बजरंग चौकातील आठ ते दहा दुकानात एक ते दीड फुट पाणी साचले होते. यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

औरंगाबादेत मुसळधार, बजरंग चौकात पुन्हा साचले तळे
बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण

चिश्‍तिया चौकीतून बळीराम पाटील शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बजरंज चौकातून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला दरवेळी पावसाच्या पाण्याने तळे साचते. सिमेंट रस्ता उंच झाल्याने पाण्याला वाट मिळत नाही. रस्ता होण्यापुर्वी हे पाणी नेहरु गार्डनकडे जात होते. त्यामुळे जळगाव रोडवरील देवगिरी बँक, वोखार्ड कंपनीकडून येणारे पाणी याठिकाणी साचते. साचलेले पाणी जाण्यासाठी सिमेंट रस्ता बांधताना पाणी वाहून जाण्यासाठी कुठलाही पाईप टाकण्यात आला नाही, असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

औरंगाबादेत मुसळधार, बजरंग चौकात पुन्हा साचले तळे
रायगव्हाण व तावरजाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

बजरंग चौकातील नुकसान झालेल्या नागरिकांनी महापालिका आणि अग्निशमन विभागाकडे मदत मागितली. यासाठी सरिता घोडतुरे यांनी पुढाकार घेतला. पिठाची गिरणी, शिवणयंत्र, इलेक्ट्रिकल, वडापाव, गॅरेज, ज्युस सेंटर याप्रकारची दुकाने आहेत. त्यांच्याकडील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाल्याच्या कामामुळे पाणीपाणी

बजरंग चौकातील चंचल ज्युस सेंटरच्या परिसरात ड्रेनेजचे काम १५ दिवसांपासून सुरु आहे. त्याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट असल्याने साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी येत आहे. या कामामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासही अडथळे येत आहेत.

दुकानदार म्हणतात...

दरवेळेस होतेय नुकसान

प्रिया मोरे : वडापावचे दुकान आहे. प्रत्येक पावसात दुकानात पाणी येते. त्यात नाल्याचे पाणीच अधिक असते. दरवेळेस दुकानातील साहित्याचे नुकसान होते.

कपड्यांचे झाले नुकसान

भाऊसाहेब हिंगमिरे : टेलरिंगचे दुकान असून शिलाईसाठी आलेले कपडे भिजले आहेत. पाऊस उघडल्यानंतर एक दिवस पाणी काढून साफसफाई करण्यातच जातो.

फ्रीजचे काँप्रेसर जळाले

अशोक परदेशी : आमच्या चंचल ज्युस सेंटरमधील फ्रीजचे काँप्रेसर जळाले. दुकानात अर्धा फुट पाणी आल्याने रॅकवर ठेवलेली फळेही खराब झाले आहेत.

गिरणीचे होते नुकसान

गोकुळ हिवाळे : पिठाची गिरणी असून गेल्यावेळी मोटार जळाही होती. उदरनिर्वाहाचे एवढेच साधन असल्याने पावसामुळे दरवेळेचे नुकसान त्रासदायक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com