Chh. Sambhajinagar: गंगापूरमधील ५० जणांना पुराच्या पाण्यातून वाचवले
Chh. Sambhajinagar Flood: गंगापूर तालुक्यात धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाच्या व स्थानिकांच्या मदतीने ५० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
गंगापूर : तालुक्यात शनिवार दुपारी चारपासून सुरू झालेल्या धुवाधार पावसाने रविवारी सकाळी ११पर्यंत हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले असून, ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.