Chh. Sambhajinagar: मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर तडाखा; अनेक गाड्या रद्द, काही मार्ग बदलून धावल्या
Train Cancellations: हैदराबाद विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे पूर्णपणे रद्द झाल्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. या बदलांचा परिणाम मराठवाड्याच्या रेल्वे वेळापत्रकावरही झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या (दमरे) हैदराबाद विभागात भिकनूर, तळमडला, अक्कनपेट आणि मेडक या मार्गांवर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. काही मार्ग बदलून धावल्या.