उच्च न्यायालयाने सांगितले तरच कामावर हजर होऊ

संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांचा पवित्रा
ST Bus
ST Busesakal

औरंगाबाद : उच्च न्यायालयाने सांगितले तर कामावर हजर होऊ, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी (ता. बारा) झालेल्या बैठकीत शासनात विलिनीकरणाचा लढा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत सुरुच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला. दरम्यान, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमही घेण्यात आला. (ST Worker Strike)

ST Bus
शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे

एसटीचे शासनात विलिनीकरण करण्यासंदर्भात समितीकडून अहवाल देण्यात येणार आहे. तो अहवाल उच्च न्यायालयात सादर होईल आणि त्यानंतर विलिनीकरणाचा निर्णय येईल. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाईल. उच्च न्यायालयाने सांगितले तर कामावर हजर व्हा, त्यादिवशी कामावर हजर व्हायचे, असे मच्छिंद्र बनकर, मकरंद कुलकर्णी यांनी सांगितले. खबरदारी म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता आगारात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी केवळ मोजके कर्मचारी उपस्थित राहतील. आंदोलनस्थळी गर्दी न करता कर्मचारी घरी राहूनच दुखवट्यात आपला सहभाग घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com