Pune : नारायणगाव आगारातील चालक, वाहक आज पासून संपावर

दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या प्रवाशांचे हाल
st
st Sakal

नारायणगाव (पुणे) : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेने सुरु केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी नारायणगाव आगारातील २८८ चालक, वाहक आज पासून अचानकपणे संपावर गेले. या मुळे दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या प्रवाशांचे हाल झाले.पुकारलेल्या संपामुळे आज नारायणगाव आगाराचे सुमारे बारा लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.आशी माहीती आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेने ऐन दिवाळीत चार नोव्हेंबर पासून आंदोलन सुरू केले आहे.मात्र संपाला पाठिंबा देऊन नारायणगाव आगारातील चालक, वाहक सेवा बजावत होते. या मुळे दिवाळीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत झाली. मात्र राज्य शासन एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाकडे दुर्लक्ष करत असल्याची धारणा झाल्याने आज सकाळ पासून येथील आगारातील २८८ चालक, वाहक आज सकाळ पासून अचानकपणे संपावर गेले.

st
थकवा आलाय...एकांतवासात जातोय; अमोल कोल्हेंची पोस्ट

यामुळे नारायणगाव आगारातून पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, बोरिवली, ठाणे आदी भागात जाणाऱ्या एसटी बस अचानक बंद कराव्या लागल्या. या मुळे दिवाळी सणा नंतर पुन्हा माघारी निघालेल्या प्रवाशांची गैरसोय झाली.या बाबत आगर प्रमूख सूर्यवंशी म्हणाले पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव हे महत्वाचे आगार आहे.आगारात ८० बस असून या बसद्वारे रोज ५४६ फेऱ्या होतात. दिवाळी सणामुळे आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली होती. शनिवारी दिवसभरात साडेनऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आज वाढलेली प्रवाशी संख्या पहाता किमान बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. चालक, वाहक आज अचानकपणे संपावर गेल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com