Chh. Sambhajinagr Crime : देहविक्रयचे धागेदोरे दिल्लीपर्यंत; संशयित कल्याणी देशपांडेला ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

शहरातील उघडकीस आलेल्या हायप्रोफाइल देहविक्रय रॅकेटचे धागेदोरे आता दिल्लीपर्यंत पोचले. संशयित आरोपी तुषार राजपूतच्या तावडीतून सुटका करण्यात आलेली उजबेकीस्तानातील महिला आणि दिल्लीच्या दोन महिलांना दिल्लीतील दियाना नामक महिला एजंटने संशयित आरोपी कल्याणी ऊर्फ जयश्री उमेश देशपांडे हिच्याकडे पाठविल्याचे तपासात समोर आले.
high profile sex racket of chhatrapati sambhajinagar accused kalyani deshpande police custody till 30 january
high profile sex racket of chhatrapati sambhajinagar accused kalyani deshpande police custody till 30 januaryesakal

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उघडकीस आलेल्या हायप्रोफाइल देहविक्रय रॅकेटचे धागेदोरे आता दिल्लीपर्यंत पोचले.

संशयित आरोपी तुषार राजपूतच्या तावडीतून सुटका करण्यात आलेली उजबेकीस्तानातील महिला आणि दिल्लीच्या दोन महिलांना दिल्लीतील दियाना नामक महिला एजंटने संशयित आरोपी कल्याणी ऊर्फ जयश्री उमेश देशपांडे हिच्याकडे पाठविल्याचे तपासात समोर आले.

कल्याणीला ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खेडकर/गरड यांनी रविवारी (ता. २१) दिले. उजबेकिस्तानची महिला आणि दिल्लीच्या दोन पीडितांना देशपांडे हिने दिल्लीची एजंट दियाना हिच्यामार्फत कुंटणखान्यात आणल्याची कबुली दिली; देशपांडे हिने एका पीडित महिलेला नोकरी देण्याचे सांगून आपल्या घरात डांबून ठेवून तिच्याकडून देहविक्रय व्यवसाय करून घेतल्याचे समोर आले.

देशपांडे हिला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी देशपांडे हिने आतापर्यंत किती महिलांना नोकरीचे आमिष दाखवून घरात डांबून ठेवत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला, इतर कोण-कोणत्या ठिकाणच्या कुंटणखान्यात पीडित महिलांना पुरवले याचा तपास करायचा आहे.

आरोपी आणखी किती शहरात हे रॅकेट चालवत होते, त्यांचे एजंट कोण आहेत याचा तपास करून त्या कुंटणखान्यावर छापा मारायचा आहे. देशपांडे आणि राजपूत यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर पीडित महिलांचे फोटो शेअर करून संभाषण होत असल्याचे समोर आले आहे.

विदेशी पीडित महिलांना अशा प्रकारे आणखी कोठे डांबून ठेवले आहे का याचदेखील तपास बाकी आहे. त्यामुळे देशपांडे हिला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.

आतापर्यंत सात जणांना बेड्या

गुन्ह्यात आतापर्यंत सात संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यातील संदीप मोहन पवार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सुनील रामचंद्र तांबट याला न्यायालयाने जामीन मंजूर केला.

ज्योती प्रकाश साळुंके हिला सीआरपीसी नुसार नोटीस बजावण्यात आली. तुषार राजन राजपूत, प्रवीण बालाजी कुरकुटे, गोपाल लक्षमीनारायण वैष्णव, लोकेशकुमार केशमातो आणि अर्जुन भुवनेश्‍वर दांगे या चौघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com