ABD26J78878 हट्टा ः अपघातानंतर ऑटोरिक्षाची झालेली अवस्था.
------
अपघातात मायलेकीसह
चौघांचा मृत्यू, ५ जखमी
-----
वसमत तालुक्यात रिक्षाला धडक
--
हट्टा (जि. हिंगोली), ता. ७ : भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने मायलेकीसह चौघांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना कळंबा (ता. वसमत) पाटीजवळ सोमवारी (ता. सात) दुपारी घडली.
औंढा नागनाथ येथून प्रवाशांना घेऊन रिक्षा (एमएच २२ एपी २१४९) परभणीच्या दिशेने निघाली होती. कळंबा पाटीजवळ भरधाव वाहनाने धडक दिल्याने रिक्षा रस्त्याखाली जाऊन उलटली. ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातात अद्विका संदीप साळवे (वय दीड वर्ष) व एका अकरावर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर इतर जखमींना परभणी येथे दाखल केल्यानंतर प्रज्ञा संदीप साळवे (वय ३०, रा. औंढा नागनाथ) व अर्चना संभाजी थोरात (वय ३५, रा. गुरूपिंपरी, ता. घनसावंगी, जि. जालना) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश दत्तराव जाधव (रा. जोडजवळा, ता. वसमत), रेखा रणखांबे, ओंकार रणखांबे, समीरखान, साई संभाजी थोरात हे गंभीर जखमी आहेत. हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप बोरकर, उपनिरीक्षक संजय केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. ११ वर्षीय मुलाची ओळख पटलेली नव्हती.