Tech Boost in Police Bharti: Hingoli Uses Sensors for Precise Race Timing

Tech Boost in Police Bharti: Hingoli Uses Sensors for Precise Race Timing

Sakal

Hingoli Police Recruitment: हिंगोली पोलिस भरतीत उमेदवारांच्या पायाला सेन्सर; धावण्याची अचूक वेळ नोंदवण्यासाठी प्रथमच तंत्राचा वापर!

Hingoli police bharti foot Sensor Technology: हिंगोली पोलिस भरतीत आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर; धावण्याची अचूक वेळ नोंदवण्यासाठी उमेदवारांच्या पायाला सेन्सर
Published on

हिंगोली: हिंगोली पोलिस दलातील ६४ पदांच्या भरती प्रक्रियेला बुधवारपासून (ता. ११) सुरळीत सुरवात झाली. सकाळी साडेचारपासूनच उमेदवारांना संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर प्रवेश देण्यात आला. यावेळी प्रथमच 'आरएफआयडी' (रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यात धावण्याच्या चाचणीमध्ये उमेदवारांच्या पायाला सेन्सर बसविण्यात आले. त्यामुळे धावण्याच्या सुरवातीपासून ते शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर अचूक वेळ नोंदवली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com