esakal | तिथे गांधीविचार असते, तर तालिबानीस्तान झालाच नसता !
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

तिथे गांधीविचार असते, तर तालिबानीस्तान झालाच नसता !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधींजींचे विचार संपवणारी परिस्थिती सध्या देशात होऊ पाहतेय. गांधीजींची विचारधारा सर्वधर्म समभावाची पण, सध्या तोडफोडीचे विचार सुरु आहेत. जगात हिंसा वाढत असतानाच अफगाणिस्तानचे अस्तित्व तालिबान्यांनी नष्ट केले. जर अफगाणिस्तानात गांधी विचार असते, तर तो देश संपला नसता, त्याची शकले झाली नसती, एवढी ताकद गांधी विचारांमध्ये आहे. गांधीविचार देश, लोकशाहीला बळकट करणारे आहेत, असे ठाम मत तरुणाईने व्यक्त केले. महात्मा गांधी यांची आज जयंती. त्यानिमित्ताने गांधी विचारांवर तरुण पिढीने भरभरुन व आशयपूर्ण मते व्यक्त केली.

परितोष श्रीखंडे : महात्मा गांधींजींच्या विचाराविरुद्ध वर्तणूक करणारे सध्याचे शासन असून देशातील परिस्थिती देशात आहे. विद्यमान परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर शांतीसाठी सत्याग्रहाची गरज आहे. तो आपण करण्याची वेळ आली आहे. गांधींजींचे विचार संपवणारी सध्याची परिस्थिती देशात होऊ पाहतेय. गांधीची सर्वधर्म समभावाची विचारधारा होती.

ओंकार व्यवहारे, विद्यार्थी : स्वातंत्र्यासाठी सर्वच लढवय्यांनी पुढाकार घेतला. त्या सर्वांत महत्वाचे योगदान महात्मा गांधींचे आहे. अहिंसा हे तत्व त्यांनी जगाला दिलेला अमूल्य संस्कार आहे. त्यांच्या विचारांमुळे जागतिक पातळीवर भारताची वेगळी ओळख प्राप्त झाली. अफगाणिस्तानसारखी स्थिती भारताची कधीच होणार नाही. त्यामागे गांधीजींचे विचार आहेत. अहिंसा, शांततेच्या मार्गानेच समस्या सुटतात हे त्यांनी जगाला दाखवून दिले.

हेही वाचा: महात्मा गांधी - सर्वात ‘निर्भय' माणूस

श्रद्धा मेथे, विद्यार्थिनी : जातीभेदाबाबत महात्माजींचे विचार अनुकरणीय होते; परंतु आजच्या स्थितीत या विचारांनी कुणी चालत नाही. कारण लोक स्वःतचा फायदा बघतात. जिथे-तिथे जातीभेदही केला जातो. गांधींना ‘आयडीयल’ सर्व मानतात पण जेव्हा वेळ त्यांच्या विचारांवर चालण्याची येते तेव्हा विचारांची साथ सोडली जाते. गांधींजींच्या विचारांनी लोक खरोखरच वागले तर समाजात चांगला बदल होईल.

नाजमीन शेख, विद्यार्थिनी : आधुनिक विश्‍वात स्वःतची तत्वे, मूल्यांनुसारच कृती करणारे महात्मा गांधींचे व त्यांच्या विचारांचे अनुकरण जग करीत आहे. हिंसेने ग्रस्त अफगाणिस्तानला गांधी विचार रस्ता दाखवू शकतात. सत्य आणि अहिंसेद्वारेच सर्व काही मिळवता येते हे त्यांनी दाखवुन दिले.

हेही वाचा: कायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकले -आ. वैभव नाईक

भाग्यश्री खांडरे : आज आफगानिस्तानला तालिबानने बळकावून घेतले. १९४७ पूर्वी पारतंत्र्यात आपलीही तशीच काहीशी परिस्थिती होती. त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या योगदानामुळेच इंग्रजांना पळवून लावण्यात यश आले. हे सर्व त्यांच्या अहिंसेच्या मार्गाने व विचारांनी घडले. आजही गांधींजींचे विचार देशाला तारणारे आहेत.

loading image
go to top