दानवे साहेब तुम्ही देशाचे रेल्वेमंत्री आहात की जालन्याचे : इम्तियाज जलील | Imtiaz Jaleel Comment On Raosaheb Danve | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiaz Jaleel
दानवे साहेब तुम्ही देशाचे रेल्वेमंत्री आहात की जालन्याचे : इम्तियाज जलील

दानवे साहेब तुम्ही देशाचे रेल्वेमंत्री आहात की जालन्याचे : इम्तियाज जलील

औरंगाबाद : दानवे साहेब तुम्ही देशाचे रेल्वेमंत्री आहात की जालन्याचे, असा टोला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना लगावला आहे. औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आज सोमवारी (ता.तीन) पार पडली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जलील पुढे म्हणाले, औरंगाबाद (Aurangabad) येथे होणारे रेल्वे पीटलाईन दानवे यांनी जालन्याला नेले आहे. आगामी काळात खासदारकीची निवडणूक न लढवता महानगरपालिका अथवा नगरपरिषदेची लढवावी असा सल्ला जलील यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवेंना दिला आहे.(Imtiaz Jaleel Criticize Raosaheb Danve Over Railway Pit Line In Aurangabad)

हेही वाचा: धक्कादायक! मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात तब्बल 50 सापांचा मृत्यू

ड्रायपोर्ट असूनही पीटलाईन जालन्याला घेऊन गेले आहे. हे चुकीचे आहे. त्यांना राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ओमिक्राॅन रुग्णांमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा आरोग्यमंत्री लाॅकडाऊनचे संकेत देत आहेत. त्यावर बोलताना इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, आम्ही कोणत्याही प्रकारच्या लाॅकडाऊनचे समर्थन करित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेने औरंगाबादेतील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळविले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Imtiaz Jaleel
loading image
go to top