Nanded News : आईच्या अवयवदानाने मुलाचा पुनर्जन्म अवयव प्रत्यारोपण यशस्वी

अर्धापूर शहरातील नंदाबाई बाबुराव सोळंके या हिरकणी माता असून त्यांनी आपला मुलगा सोमनाथला किडणी दान दिली आहे.
nanded
nandedsakal

अर्धापूर : ‘आई सारखे दैवत नाही’ या जगात, म्हणून शिकणे अ आ ई... हे मराठी चित्रपटातील गीत एकदा तरी आपल्या कानावर पडले असेल. देवाचे दुसरे रुप म्हणजे आई. आपाल्या लेकरांचा प्राण वाचविण्यासाठी आई कोणतेही धाडस करायला तयार असते. इतिहासातील हिरकणीची कथा सर्वांना माहीत आहेच. अर्धापूर तालुक्यातील आधुनिक हिरकणीने आपल्या लेकरास अवयव दान देऊन लेकराचे प्राण वाचविले आहेत.

अर्धापूर शहरातील नंदाबाई बाबुराव सोळंके या हिरकणी माता असून त्यांनी आपला मुलगा सोमनाथला किडणी दान दिली आहे. ही अवयव प्रत्यारोपणाने शस्त्रक्रिया काही महिन्यांपूर्वी मुंबईत करण्यात आली आहे. आई व‌ मुलाची तब्येत ठणठणीत आहे. अवयव प्रत्यारोपणाने शस्त्रक्रिया विषयी नागरिकांत भीती असते.

या भितीपोटी अवयव दानासाठी कोणी तयार होत नाही. रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांशिवाय हे धाडस करायला कोणी तयार होत नाही. असेच धाडस शहरातील बस्थानक परिसरात राहणाऱ्या नंदाबाई बाबुराव सोळंके यांनी केले आहे. त्यांच्या सोमनाथ या धाकट्या मुलाला किडणीचा आजार झाल्याचे वैद्यकीय तपासणीअंती निष्पन्न झाले. हा आजार कमी होण्यासाठी विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण आजार बळावत गेल्याने डॉक्टरांनी अवयव प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.

अवयव कोण देणार हा प्रश्न निर्माण झाल्यावर आई नंदाबाई तयार झाल्या. आई व मुलाच्या सर्व वैद्यकीय चाचण्या व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या. मुंबई येथील जसलोक रुग्णालयात सुमारे आठ महिन्यांपूर्वी ही अवघड मानली जाणारी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रत्यारोपण शस्त्रक्रिमुळे सोमनाथचा (वय २८) एका प्रकारे पुनर्जन्म झाला आहे. व्यक्ती जिवंत असताना किडणी, लिव्हर हे अवयव दान करु शकतात. तर मृत्यूनंतर अवयव दान करावयाचे असेल तर अवयवदानाचा अर्ज भरून द्यावा लागतो. डोळे, किडनी, लिव्हर, हृदय आदी अवयवांचे दान देता येते. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल लंगडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com