esakal | 'रेकॉर्डब्रेक' निकाल! बारावीत औरंगाबादमधील 99.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

HSC Result 2021

यंदा जिल्ह्याचा निकाल ९९.५३ टक्के इतका लागला. विभागातून बारावीच्या निकालात औरंगाबाद जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे.

बारावीत औरंगाबादमधील 99.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी (ता.तीन) दुपारी चार वाजता जाहीर करण्यात आला. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील ९९.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हेही वाचा: Corona Vaccination: औरंगाबाद शहरात केवळ १४.५५ टक्के लसीकरण!

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा रद्द केल्यामुळे दहावी, अकरावी व बारावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात मूल्यमापन कार्यपद्धती व तरतुदीनुसार व दहावीमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथमसत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण, तसेच तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे बारावीसाठी भारांशनुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले.

हेही वाचा: वाळूजमध्ये नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहनाच्या धडकेत एक ठार

सदर गुणदान विचारात घेऊन मंडळाने विहीत कार्यपद्धतीनुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे. यंदा जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी ५३ हजार ४४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात ३० हजार ७८६ मुले; तर २२ हजार ३२२ मुली होत्या. त्यापैकी ५३ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ३०,७६५ मुले आणि २२,३१३ मुली उत्तीर्ण झाल्या; तर २५१ विद्यार्थी नापास झाले आहेत. यंदा जिल्ह्याचा निकाल ९९.५३ टक्के इतका लागला. विभागातून बारावीच्या निकालात औरंगाबाद जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: Corona Vaccination: औरंगाबाद महापालिकेला मिळाल्या तब्बल २१ हजार लसी

विद्यार्थ्यांना निकालाबाबत तक्रार करण्याची संधी

अनेक गुणवंतांनी दहावीच्या निकालानंतर नाराजी व्यक्त केली होती. ही बाब लक्षात घेता बोर्डाने बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर सुविधा उपलब्ध केली आहे. तक्रार निवारण अधिकारी म्हणून संबंधित विभागीय मंडळातील सहसचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यपद्धतीचा तपशील हा मंडळाच्या अधिकृत वेबसाइटर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

loading image
go to top