
औरंगाबाद : टीईटी परीक्षा घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. आता या टीईटी घोटाळ्यात ७ हजार आठशे उमेदवार हे पैसे देऊन पात्र झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या सर्व शिक्षकांच्या सेवा समाप्त करून त्या जागा पवित्र पोर्टलमार्फत नव्याने भरती कराव्यात, अशी मागणी अशी मागणी डीटीएडबीएड स्टुडंट असोसिएशने केली आहे.
हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
२०१२ नंतर राज्यात प्रशासन व संस्थाचालक यांनी संगनमताने हजारो बोगस शिक्षकांची भरती केली होती. मात्र, शासनाने टीईटी पास अनिवार्य केली. त्यामुळे मुदतीत पास न झाल्यास नोकरी जाईल, या धास्तीने अपात्र शिक्षकांनी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केल्याचे स्पष्ट होते. मात्र, या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन त्याची चौकशी एसआयटीद्वारे करावी, असे डिटीएड असोसिएशनचे म्हणणे आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आणि संबंधित व्यक्तींनाही कठोर स्वरूपाची दंडात्मक शिक्षा करावी अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
राज्य परीक्षा परिषदेच्या २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल १९ जानेवारी २०२० रोजी जाहीर झाला होता. या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ विद्यार्थ्यांना पात्र ठेवण्यात आले होते. त्यातील तब्बल ७ हजार ८०० विद्यार्थी अपात्र असताना हजारो रुपये घेऊन पात्र ठरविण्यात आल्याचे समोर आले आहे. डीटीएडबीएड स्टुडंट असोसिएशनने अपात्र उमेदवारांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. अपात्र उमेदवारांना न्यायालयाने ३० मार्च २०१९ ही परीक्षा पास होण्याची अंतिम मुदत दिली होती.
Web Title: Investigate The Tet Exam Scam Through Sit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..