Sambhaji Nagar News : भगवान गडावर येण्याचे पंतप्रधानांना निमंत्रण ; भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री सानप महाराज

पंतप्रधानांनी या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे घोळवे यांनी म्हटले आहे.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री क्षेत्र भगवान गडावर यावे, असे निमंत्रण पंतप्रधानांच्या नाशिक दौऱ्यात भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री सानप महाराज यांनी दिले आहे.

पंतप्रधान नाशिक येथील काळाराम मंदिर येथे दर्शनासाठी नुकतेच आले होते. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक येथे निमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांचाही समावेश होता.

गडाचे सचिव गोविंद घोळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक दौऱ्यात पंतप्रधानांना भगवान गड भेटीचे निमंत्रण देण्यात आले. आगामी दोन वर्षांनी श्री क्षेत्र भगवान गडाचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांनी या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे घोळवे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com