esakal | ITI Admission: आयटीआयसाठी शनिवारी प्रसिद्ध होणार अंतिम गुणवत्ता यादी
sakal

बोलून बातमी शोधा

iti

या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी येत्या शनिवारी (ता.४) जाहीर होणार आहे

ITI Admission: आयटीआयसाठी शनिवारी प्रसिद्ध होणार अंतिम गुणवत्ता यादी

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी (ता.दोन) जाहीर झाली. या गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी शुक्रवारी (ता.३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. अंतिम यादी शनिवारी (ता.चार) प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालयाने स्पष्ट केले आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतंर्गत यंदा २ लाख ८८ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे.

या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी येत्या शनिवारी (ता.४) जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेतंर्गत प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी शुक्रवारी (ता.३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविता येणार आहेत. तसेच प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत बदल करायचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश करून तसा बदल करणे शक्य होणार आहे. यानंतर प्रवेश अर्जात बदल करण्यासाठी कोणत्याही प्रकारे सवलत देण्यात आलेली नसल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: खंडाळा येथे पाझर तलावमध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

पर्याय सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना पाठवणार 'एसएमएस'
-यंदा आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठवाड्यातून ५६ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५ हजार २१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज शुल्क भरले आहे. तर ५५ हजार २१६ विद्यार्थ्यांनी पर्याय (विकल्प) सादर केले आहेत. प्रवेश अर्ज शुल्क भरलेले आणि पर्याय सादर केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत असल्याने आतापर्यंत पर्याय न भरलेल्या विद्यार्थ्यांना 'एसएमएस'द्वारे पुन्हा पर्यायी अर्ज भरण्याचे कळविण्यात येत आहे. तसेच पर्याय अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: पालकमंत्री सुभाष देसाईंनी केले औरंगाबादचे दहावेळा नामांतर!

मराठवाड्यातील जिल्हानिहाय अर्जातील तफावतीची स्थिती

जिल्हा ------- अर्ज निश्चिती --- विकल्प सादर अर्ज
-औरंगाबाद-- ९२८९ --------- ८६६३
- बीड -------८३७० ---------- ७९४३
- हिंगोली --- ३१९२ ---------- २९७४
- जालना --- ६१०६ ---------- ५७१०
- लातूर ----- ८८८३ --------- ८४६२
- नांदेड ----- ९९४८ -------- ९४४५
- उस्मानाबाद -३९१९ ------ ३७२६
- परभणी ---- ५५०९ ------ ५१३७

loading image
go to top