esakal | पालकमंत्री सुभाष देसाईंनी केले औरंगाबादचे दहावेळा नामांतर!
sakal

बोलून बातमी शोधा

subhash desai

राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई शुक्रवारी (ता.तीन) औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत

पालकमंत्री सुभाष देसाईंनी केले औरंगाबादचे दहावेळा नामांतर!

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद: राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची हीच योग्यवेळ असल्याचे सांगत नामांतर लवकरच करणार असल्याचे म्हटले होते. याबाबत पालकमंत्र्यांच्या शुक्रवारच्या (ता.३) सरकारी दौऱ्याच्या कार्यक्रमात प्रत्यंतर आले. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई शुक्रवारी (ता.तीन) औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम त्यांच्या अधिकृत लेटरहेडवरून जाहीर करण्यात आला आहे. यात देसाई यांनी एक नव्हे तर तब्बल दहा वेळा औरंगाबादऐवजी 'संभाजीनगर' असा उल्लेख केला आहे. विशेष कार्य अधिकारी नितीन शिंदे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्याचा उल्लेखच पालकमंत्र्यांचा संभाजीनगर दौरा असा करण्यात आला आहे.

यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाहीर करताना औरंगाबाद विभागाशी संबंधित निर्णयाची माहिती सीएमओच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर देखील औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. एकंदरीत आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचे यावरून जाणवत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर असल्यामुळे या दोन पक्षांची भूमिका काय असेल या संदर्भातही अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले.

हेही वाचा: खंडाळा येथे पाझर तलावमध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

राष्ट्रवादीकडून संभाजीनगरच्या विषयावर आतापर्यंत तरी फारसे बोलले गेले नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र हा आमच्या समान विकास कार्यक्रमाचा भाग नाही, नाव बदलल्याने लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का, असे म्हणत वेळ मारून नेली आहे. काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजीनगरवर आपले मत वेळोवेळी व्यक्त केले आहे. दुसरीकडे पालकमंत्री देसाई यांनी मात्र औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ आहे, सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणे याचा निर्णय घेऊ, असे सांगत हा विषय आपल्या अजेंड्यावर असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले होते. आता तर राज्याच्या सत्तेत उद्योगमंत्र्यांनी अधिकृतपणे दौऱ्याच्या कार्यक्रमात संभाजीनगर असा उल्लेख केला जात असल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

loading image
go to top