
छत्रपती संभाजीनगर : आयटीआय ऑनलाइन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जवळपास ५० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यापैकी ३५ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत, तर २२ हजार ९४० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची संधी असून, २७ जूनपर्यंत विकल्प भरता येणार आहेत.