esakal | एप्रिल हिटमध्ये वाढ; पारा ४२ सेल्सिअस पार, जालनेकर हैराण

बोलून बातमी शोधा

null

एप्रिल हिटमध्ये वाढ; पारा ४२ सेल्सिअस पार, जालनेकर हैराण

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरवात झाली आहे. शहराचा तापमानाचा पारा चाळीशी पार झाला आहे. मंगळवारी (ता.२७) खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र येथे तब्बल ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे जालनेकर हैराण झाले असून पुढील मे महिना अधिक कडक जाण्याची शक्यता आहे. यंदा एप्रिल महिन्यांच्या सुरवातीलाच जालना शहराचा पारा चाळिशी पार गेला होता. त्यानंतर अवकाळी पावसामुळे तापमान पुन्हा खाली आले होते. मात्र, एप्रिल महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी जालना शहरात एप्रिल हिटचा अनुभव आला आहे.

हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात मंगळवारी कमाल तापमान हे ४२.१ सेल्सिअस अंश तर किमान तापमान हे २३.०४ सेल्सिअस अंश नोंदविले गेले आहे. त्यामुळे जालनेकरांना यंदा एप्रिल महिन्याच्या शेवटी कडक उन्हाळ्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लाॅकडाउन सुरू असल्याने जालनेकर अत्यावश्यक कामांसाठी साकाळी अकरावाजेपर्यंत घराबाहेर पडल आहेत. त्यानंतर शहरातील बाराजपेठ पूर्णतः बंद होत असल्याने जालनेकरांना यंदा उन्हाचे चटके बसत नसले तर उकाड्याने हैराण होत आहेत.