esakal | जालन्यात सेफ्टी टँक साफ करताना तीन मजुरांचा गुदमरुन मृत्यू

बोलून बातमी शोधा

जालन्यात सेफ्टी टँक साफ करताना तीन मजुरांचा गुदमरुन मृत्यू
जालन्यात सेफ्टी टँक साफ करताना तीन मजुरांचा गुदमरुन मृत्यू
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : शहरातील सोनलनगर येथील एका व्यक्तीचा घरातील सेफ्टी टँक साफ करताना शुक्रवारी (ता.३०) सायंकाळी तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. सोनलनगर येथील सूर्यकांत कडेवार यांच्या घरातील सेफ्टी टँकची शुक्रवारी (ता.३०) सफाई केली जात होती. हा टँक साफ करण्यासाठी लुकस गायकवाड, प्रकाश घोडके, बाबा सय्यद बेग, (रा.रमाई नगर, जालना) हे तीन कामगार या सेफ्टी टँकमध्ये उतरले. मात्र, फेस्टी टँकमध्ये उतरल्यानंतर मुदमरून दोन जणांचा टँकमध्ये मृत्यू झाला तर एकाला खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा ही मृत्यू झाला.

हेही वाचा: वीस दिवसांनी कोरोनाबाधितांच्या यादीत नाव, रुग्णसंख्येचे आकडेवारी किती खरी?

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे आपल्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरपालिकेचे मुख्यधिकारी नितीन नार्वेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मोठी गर्दी केली. या नातेवाईकांची पोलिस प्रशासनाने समजूत घातली. अग्निशाम दलाच्या मदतीने लुकस गायकवाड, प्रकाश घोडके यांचा मृत्यदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र, बेग यांच्या नातेवाईकांना उत्तरीय तपासास विरोध केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस नातेवाईकांची समजूत काढत होते.