esakal | जायकवाडी धरणात ६७.८९ टक्के पाणीसाठा 
sakal

बोलून बातमी शोधा

जायकवाडी धरणात ६७.८९ टक्के पाणीसाठा 

जायकवाडी धरणात शुक्रवारी एकूण पाणीसाठा २२१२ दलघमी तर उपयुक्त साठा १४७४ दलघमी आहे. पाण्याची एकूण टक्केवारी ६७.८९ इतकी असून, धरणाच्या पाण्याचा औरंगाबाद शहर, जालना व परभणीसह नगर, बीड जिल्ह्यांतील काही गावांना फायदा होतो. 

जायकवाडी धरणात ६७.८९ टक्के पाणीसाठा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जायकवाडी ( औरंगाबाद): जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून १९०० तर उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पाणीपाळीचे दुसरे आवर्तन सुरू आहे. धरणात शुक्रवारी (ता. २७) ६७.८९ टक्के पाणीसाठा होता. पावसाळ्यापर्यंत धरणात जिवंत पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याने ही मराठवाड्यासाठी समाधानाची बाब आहे. 

जायकवाडी धरणात शुक्रवारी धरणाचा एकूण पाणीसाठा २२१२ दलघमी तर उपयुक्त साठा १४७४ दलघमी आहे. पाण्याची एकूण टक्केवारी ६७.८९ इतकी असून, धरणाच्या पाण्याचा औरंगाबाद शहर, जालना व परभणीसह नगर, बीड जिल्ह्यांतील काही गावांना फायदा होतो. 

हेही वाचा- जुमाची नमाज घरीच केली अदा

सध्या उन्हाळी पाण्याचे आवर्तन सिंचनासाठी डाव्या कालव्यातून १९०० क्युसेकने तर उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने सुरू आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे पाण्याचे बाष्पीभवन १.२ एमएमक्यू इतके होत आहे. रोजचा पाण्याचा वापर ०.२९० दलघमी होत असून, त्यात सिंचन, बिगर सिंचन व औद्योगिक वसाहत यांचा समावेश आहे. डाव्या कालव्यावरील अंदाजे एक लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्र, तर उजव्या कालव्यावरील ४२ हजार २०० हेक्टर क्षेत्र या दोन्ही कालव्यांमुळे जमिनीच्या ओलिताखाली येत आहे. 


यावर्षी जायकवाडी धरणाच्या पाण्याची परिस्थिती समाधानकारक असून, मॉन्सूनपर्यंत धरणात जिवंत पाणीसाठा राहील ही आनंदाची बाब आहे. सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शेतात शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. 
- बुद्धभूषण दाभाडे (सहायक अभियंता जायकवाडी धरण) 

 
 

loading image