esakal | जुमाची नमाज घरीच केली अदा 
sakal

बोलून बातमी शोधा

जुमाची नमाज घरीच केली अदा 

सर्वांना जुमाची नमाज आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत अदा केली. काही दिवसांपूर्वी इमारते शरिया आणि उलेमांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याला नागरीकांनी प्रतिसाद दिला आहे. शहरातील सर्व मशिदी पुढील निर्णय येईल पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. 

जुमाची नमाज घरीच केली अदा 

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद, ता. २७ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांना मशीदीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय संचारबंदी, लॉकडाऊन जाहिर झालेले असल्याने जुमाची नमाज घरीच अदा करावी, असे आवाहन उलेमांनी केले होते. त्यामुळे सर्वांनी आपल्या कुटुंबासह जुमाची नमाज घरीच अदा केली. त्यामुळे शुक्रवारी मशिदीत फक्त इमाम आणि मोज्जन या दोनच व्यक्ती होत्या. 

हेही वाचा - रेशनची 70 टक्के दुकाने बंद

कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन तसेच शासनाने आवाहन केल्याने मशिदीत सर्वसामान्यांना येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. पाच वेळची नमाज ही सर्वांना घरीच अदा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कुणीही मशिदीकडे आले नाही.

हेही वाचा -  प्रवाशांची गर्दी थांबता थांबेना

go to top