esakal | जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा| Jayakwadi Dam Of Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

पैठण (जि.औरंगाबाद) : जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरातुन गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आले आहे.

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : नाशिक जिल्ह्यात व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरातून (Jayakwadi Dam) बुधवारी (ता.२९) गोदावरी नदी (Godavari River) पात्रात विसर्ग धरणाच्या सांडव्यातुन सुरु करण्यात आला आहे. धरणाच्या एकुण २७ पैकी १८ वक्र दरवाजांतून ९ हजार ४३२ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. अर्धाफूटाने दरवाजे पाणी (Aurangabad) सोडण्यासाठी उघडण्यात आले आहे. सुरुवातीला पाच दरवाजेे उघडण्यात आले होते. दरम्यान, धरणात वरील भागातुन जवळपास एक लाख क्यूसेक पाणी येत असल्याने गोदाकाठच्या गावांना तालुका (Paithan) प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा: खाम नदीत वाळूज एमआयडीसीतील कामगार दुचाकीसह गेला वाहून,शोध सुरु

गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यापुर्वी नाथसागराला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देवुन विधिवत पाण्याचे जलपुजन केले. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता,विजय घोगरे, लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सबीनवार, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष पवन लोहिया, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण शाखा अभियंता बी. वाय अंधारे, तांत्रिक सहायक गणेश खराडकर, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष आगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: मराठवाड्यात तीन ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता

loading image
go to top