Sambhajinagar Accident : संभाजीनगर जिल्ह्यातील दोघे ठार ; समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ जीप उलटली, तिघे जखमी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील खंबाळे (ता. सिन्नर) शिवारात स्कॉर्पिओ जीप उलटून दोन जण ठार, तर तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मृत व जखमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करवड गावचे रहिवासी आहेत.
Sambhajinagar Accident
Sambhajinagar Accidentsakal

सिन्नर (जि. नाशिक) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील खंबाळे (ता. सिन्नर) शिवारात स्कॉर्पिओ जीप उलटून दोन जण ठार, तर तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मृत व जखमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करवड गावचे रहिवासी आहेत.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे येणारी स्कॉर्पिओ जीप (एमएच २० जीटी ००९१) रस्त्याच्या कडेला उलटली. महामार्गावरील साइड बॅरियर तोडून दोन्ही लाइनच्या मधोमध असलेल्या चारीमध्ये जीप गेली. या घटनेत बाजीराव एकनाथ गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला, तर निशा रामकिसन गडगूळ (वय २०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Sambhajinagar Accident
10th Result : दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर आता नापासचा शिक्का नाही! ; सहा महिन्यांचे मिळणार कौशल्य प्रशिक्षण

यामध्ये वाहनचालक परमेश्‍वर पुंडलिक गडगूळ (वय २१), मीनाबाई रामकिसन गडगूळ (वय ४६) हे जखमी असून, रामकिसन गडगूळ‌ यांना किरकोळ मार लागलेला आहे.जखमींना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com