जिंतूर : आगीत सहा घरे जळून खाक

आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही
जिंतूर
जिंतूरsakal
Updated on

जिंतूर: तालुक्यातील मंगरूळ तांडा येथे आगीत सहा घरे जळून खाक झाली. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही. परंतु दोन शेळ्या व दोन पाडसांचाही जळून मृत्यू झाला. सदरची दुर्घटना गुरुवारी (ता.२४) दुपारच्या सुमारास घडली.आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. परंतु चुलीमधील विस्तवामुळे आग लागली असल्याचे ऐकण्यात येत आहे.आगीत नवू लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिंतूर
Parbhani : टॅंकर रस्त्यावर पलटी, अनेकांची डिझेल भरण्यासाठी पळापळ

तालुक्यातील कौसडीपासून जवळ असलेल्या मंगरूळ तांड्यातील गोविंद रामदास आडे, विजय गोविंद आडे, राजू गोविंद आडे, भुजंग बाबुराव चव्हाण, गजानन भुजंग चव्हाण व शेषेराव शिवाजी राठोड शेतकरी कुटुंबांची कच्चा बांधकामाची व कुडाची घरे शेजारी शेजारी आहेत. गुरुवारी सकाळी स्वयंपाकपाणी आटोपून सर्वजण शेतात निघून गेले होते.शेतकामाला जाण्याच्या घाईत यापैकी कोणाच्यातरी घरासमोरच्या पडवीतील चुलीमधील विस्तव पूर्णतः विझला नव्हता.त्यामुळे वाऱ्याच्या झोतात हा विस्तव आजूबाजूला पसरून आग लागली.पाहता पाहता आगीने शेजारच्या घरांनाही विळखा घातला. यावेळी तांड्यातील महिला व नागरिकांनी आजूबाजूच्या विहिरीतून व घरातील पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरल्याने सहाही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. परंतु गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या व त्यांची दोन पाडसे जळून मेली.व घरावरील टीनपत्रे, आतील रोख वीस हजार रुपये आणि धनधान्य व इतर संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले.एकूण सुमारे नवू लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती समजताच तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुभाष होळ, सज्जाचे तलाठी तसेच बोरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंडित सिरसे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसीनीची पाहणी केली व दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत त्यांना शासनाने तातडीने मदत करण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सुचित केले.

मदतीसाठी प्रयत्न करू

सदरील आगीमध्ये गरीब शेतकऱ्यांची घरे, आतील अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने सहा कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांना आधार देण्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी देण्यासाठी आपण व्यक्तीशः प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com