छत्रपती संभाजीनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राबवलेली पारदर्शक, न्यायनिष्ठ आणि लोकहितकारी प्रशासनपद्धती आजच्या युगातही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांनी केले. .जिल्हा वकील संघ व संयोजन समितीतर्फे आयोजित अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून न्या. चपळगावकर बोलत होते. कार्यक्रमात प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी ‘अहिल्यादेवी होळकर यांची न्यायव्यवस्था व कार्यपद्धती’ या विषयावर मार्गदर्शन केले. .कार्यक्रमात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल, मुख्य जिल्हा सरकारी वकील अॅड. अविनाश देशपांडे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड. वसंतराव साळुंखे, उपाध्यक्ष अॅड. अमोल सावंत, उच्च न्यायालय वकील संघाचे पदाधिकारी सहभागी झाले. वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील, सचिव तीर्थराज चावरे, उपाध्यक्ष सुनील पडूळ यांनी मनोगत व्यक्त केले..Chh. Sambhaji Nagar News : छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यात ११६ बालविवाह रोखण्यात टास्क फोर्सला यश.ॲड. मृणाल निकम यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. राहुल भगत यांनी आभार मानले. वकिल संघाचे उपाध्यक्ष डोणगावकर, ॲड. ममता झाल्टे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमासाठी सहसचिव करण गायकवाड,.तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष अॅड. सतीश म्हस्के, अॅड. एकनाथ रोडगे, अॅड. संतोष गायकवाड, अॅड. दीपक सोरमारे, अॅड. किशोर वैष्णव, अॅड. सिद्धार्थ बनसोडे, अॅड. सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.