police Rescue childrens
sakal
ताणतणाव, वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे सध्या मोठ्यांचा संयम सुटत चाललाय आणि सोशल मीडिया, टीव्ही, मोबाइलमुळे लहानग्यांची सहनशीलता कमी होत चाललीय. यामुळे मुले घर सोडून जात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कौटुंबीक वादातून पैठण तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली थेट मध्यप्रदेशात निघून गेल्या. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुले आई-वडिलांमधील सततच्या वादाला कंटाळून अहिल्यानगर, मुंबईला निघून गेले, तर तिसऱ्या घटनेत, फक्त पालक रागावल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलगी चक्क नाशिकला वसतिगृहात जाऊन राहिली.
या चिमण्या पाखरांना शोध शोध शोधून पालक हवालदिल झाले आणि शेवटी पोलिसांत गेले. पोलिसांनीही आपला ‘खाक्या’ बाजूला ठेऊन ‘खाकी’चे कर्तव्य परिपूर्ण निभावले. पालक येताच ग्रामीण आणि शहर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलविली आणि शोधमोहिमा राबवून या सर्वांना त्यांच्या घरी सुखरूप परत आणले.