Chhatrapati Sambhajinagar: तुला वडील नको का? मंगळसूत्र तोडते, तुझ्या पाया पडते, पण तू मागं ये; आईची आर्त विनवणी, पण शेवटी...

Khavdya Dongar Incident Leaves Chandgude Family Devastated: कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात घडलेल्या या घटनेची एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून नोंद करण्यात आली असून, आयफोनच्या हप्त्यांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तणावाचीही चौकशी केली जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar Incident

Chhatrapati Sambhajinagar Incident

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मोठा मुलगा अपघातात गेला. आता आधार होता तो लहान कुणालचा. त्याला लाडाकोडात वाढवलं. एवढे दिवस त्याचे सारे हट्ट पुरवले. पण हेच पोटचं लेकरू आज खवड्या डोंगरावर मृत्यूच्या अगदी काठावर उभं होतं. त्याला पाहून मातेचं काळीज थरथरलं! धीर एकवटून ती त्याला समजावत होती. हात जोडत होती. मी तुझ्या शब्दांचा मान राखला; आतातरी काही करू नको, तुझ्या पाया पडते, अशी हाक देत तिनं जमिनीवर डोकंही ठेवलं. ‘‘तुला वडील नको, तर दोघंच सोबत राहू, बघ मी मंगळसूत्र तोडते; पण तू मागं ये...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com