

Chh. Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क येथील समाज कल्याण विभागाच्या एक हजार मुलांच्या वसतिगृहात युनिट क्रमांक एकच्या भोजनात मंगळवारी (ता. २५) सायंकाळी पाल आढळली. यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलटीचा त्रास होऊ लागला. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, इतर विद्यार्थ्यांनी वसतिगृहासमोर ठिय्या देत रोष व्यक्त केला.