कीर्तनकारांच्या 'त्या' व्हिडीओचा तृप्ती देसाई आज करणार भांडाफोड

औरंगाबादमध्ये किर्तनकार महिला आणि किर्तनकार पुरुषाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
trupti desai
trupti desai google

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कीर्तनकार महिला आणि कीर्तनकार पुरुषाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून यावर विविध क्षेत्रांतून टीका होत आहेत. यामध्ये प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनीही सहभाग घेतला असून त्यांनी या प्रकरणाचा भांडाफोड करणार असल्याचं सांगितलंय.

(Kirtankar's Sex Viral Video Updates)

दरम्यान दोन दिवसांपासून मराठवाड्यातील कीर्तनकार महिला आणि पुरुषाचा अश्लील व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या तीन मिनीटांच्या व्हिडीओमध्ये ते दोघेजण अश्लील चाळे करताना दिसत आहेत. या प्रकरणावर तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला असून काल पोस्ट करत आपण उद्या या प्रकरणाचा भांडाफोड करणार असल्याचं सांगितलं आहे. देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, "कीर्तनकारांच्या लोकं पाया पडतात आणि यांनीच जर असा निर्लज्जपणा करत असतील तर आवाज उठवलाच पाहिजे," असं त्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

trupti desai
तणाव कमी करण्यासाठी ४ दिवसांचा आठवडा; ६० टक्के नागरिकांची पसंती

दरम्यान त्यांनी केलेल्या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. "अशा विकृतींवर कडक कारवाई केली पाहिजे आणि समाजानेदेखील यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे.. वारकरी संप्रदायानेदेखील अशा विकृत प्रवृत्तींवर आळा घातला पाहिजे." अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

"एका प्रतिष्ठित किर्तनकाराचे कीर्तनकार महिलेबरोबर संभोग करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून ते मला प्राप्त झाले आहेत, कीर्तनकाराच्या नावासहित उद्या कारवाईची मागणी करणार आहे." अशा आशयाची पोस्ट देसाईंनी काल केली होती.

trupti desai
IPL 2022 : पहिल्याच चेंडूत तंबूचा रस्ता अन् विराटचा राग अनावर; पाहा व्हिडिओ

सदर किर्तनकार महिलेने घेतले विष

या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेने विष पिल्याची माहीती समोर आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे झालेल्या बदनामीमुळे आणि आज तृप्ती देसाई भांडाफोड करणार या भीतीने विष घेतलं असल्याचं बोललं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com