Sambhaji Nagar : कुणबी जातप्रमाणपत्र अर्ज ई-महासेवा-सेतूमध्ये

सरकार सेतू सुविधा केंद यांना देखील जातप्रमाणपत्र अर्ज भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करण्याचे आदेश देण्यात आले असून, याशिवाय विशेष कॅम्पदेखील अयोजित करण्यात आल्याचे देखील रमेश मुंडलोड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
sambhaji nagar kunbi cer..
sambhaji nagar kunbi cer..sakal

छत्रपती संभाजीनगर : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदी आता व्यक्तीनिहाय आणि गावनिहाय जाहीर करण्याची अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे. ज्या नोंदी आढळून आल्या, त्या नोंदीतून अधिकाधिक मराठा समाजाला जातप्रमाणपत्र मिळावे यासाठी आता जातप्रमाणपत्र अर्ज ई-महासेवा आणि सेतू सुविधा केंद्रात भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ, चौका, विठ्ठलपूर, फेरण जळगाव, आडगाव बु., सावंगी, चिकलठाणा सहजापूर, झाल्टा निपाणी, वरूड, ढवळापुरी, जयपूर, वरझडी, पांढरी, चित्तेगाव, लामकाना, खोडेगाव, पोखरी, वाहेगाव, मुरूमखेडा आदी १९ गावांमध्ये मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

sambhaji nagar kunbi cer..
Sambhaji Nagar News : गरिबांच्या ‘घरकुला’त पुन्हा आडकाठी ; योजनेची पायाभरणीच होईना तर घरभरणी कधी होणार

त्यानुसार नोंदी आढळलेल्या व्यक्तींची यादी तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली आहे. लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी गावामध्ये दवंडी व लाऊड स्पीकरद्वारे कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करण्यात येत आहेत.

त्याचप्रमाणे ई महासेवा आणि आपले सरकार सेतू सुविधा केंद यांना देखील जातप्रमाणपत्र अर्ज भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करण्याचे आदेश देण्यात आले असून, याशिवाय विशेष कॅम्पदेखील अयोजित करण्यात आल्याचे देखील रमेश मुंडलोड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com