लातूर विमानतळाला 'लायसन्स' कुठेय? 'व्हीआयपीं'चा जीव धोक्यात घालून होताहेत उड्डाणे; धावपट्टीचे 'ऑडिट' रखडल्याची धक्कादायक माहिती

Lack of DGCA License Raises Serious Questions Over Latur Airport Operations : डीजीसीए लायसन्सशिवाय लातूर विमानतळावर उड्डाणे सुरू असून, १५ वर्षांपासून धावपट्टीचे ऑडिटही झालेले नाही, त्यामुळे विमान सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Latur Airport

Latur Airport

esakal

Updated on

लातूर : विमानांचे (Latur Airport) उड्डाण करण्यासाठी किंवा विमान उतरवण्यासाठी विमानतळाला अधिकृत लायसन्स घ्यावे लागते. हे लायसन्स लातूर विमानातळाला अद्याप मिळालेले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या १५ वर्षांत धावपट्टीचे ‘ऑडिट’ झालेले नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा तांत्रिक सुविधाही येथे उपलब्ध नाहीत. असे असताना ‘व्हीआयपीं’सह अनेकांचा जीव धोक्यात घालून लातूर विमानतळावरून विमानांचे उड्डाण केले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com